६ एससी, २७ एसटी, ६ ओबीसीसाठी राखीव
चोपडा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील तहसीलदार भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, नायब तहसीलदार योगेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सकाळी ११ वाजता नगरपालिकेच्या शरदचंद्रिका सुरेश पाटील नाट्यगृहात ७९ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आले. त्यात ४० ग्रामपंचायती सर्वसाधारण, ६ ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्ग तर ६ ग्रामपंचायती अनुसूचित जाती, २७ ग्रामपंचायती अनुसूचित जमातींसाठी आरक्षण जाहिर करण्यात आले.
चोपडा तालुक्यातील अनुसुचित क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळून मुदत संपणाऱ्या ७९ ग्रामपंचायतीं करीता सन-२०२५ ते २०३० या कालावधीसाठी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात मितवाली, हातेड खुर्द, मंगरूळ, चहार्डी, वर्डी, लासुर या सहा ग्रामपंचायती अनुसूचित जातींसाठी आरक्षित असून, त्यापैकी मितवाली, वर्डी, लासुर या तीन ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
तर २७ पैकी चांदसणी, खाचणे, मजरे हिंगोणा, मजरेहोळ, मोहिदे कुरवेल, देवगाव, रुखनखेडा प्र.अ., गलंगी, पिंप्री, तावसे खुर्द, विटनेर, लोणी या १३ ग्रामपंचायती अनुसूचित जमातींसाठी राखीव असून, मामलदे, काजीपूरा, गोरगांवले खुर्द, पुनगांव, कोळंबा, सुटकार, बिडगाव, भवाळे, विरवाडे , वराड, वरगव्हाण, माचले, निमगव्हाण, वटार या १४ ग्रामपंचायती अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अनवर्दे बु., खेडीभोकरी बु., वेळोदे या तीन ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव असून, त्यापैकी कुसुंबे, अकुलखेडे, नरवाडे या तीन ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
तर ४० ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यापैकी भाई, हातेड बु., मौजे हिंगोणा, वेले आखतवाडे, मालखेडे, गोरगावले बु!, गलवाडे, चुंचाळे, आडगाव, वढोदे, घोडगाव, अजंतीसिम, बुधगाव, घाडवेल, तांदलवाडी, वडगाव बु., खर्डी, अंबाडे, वाळकी, घुमावल बु. या २० ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असून, त्यापैकी दगडी बु., विचखेडे धुपे खुर्द, दोंदवाडे, धनवाडी, गणपूर, कमळगाव, धुपे बु., नागलवाडी, कठोरा, चौगाव, वडती, गरताड, तावसे बु., सनपूले, अडावद पंचक, धानोरा प्र.अ., पारगाव, अनवर्दे खुर्द, खडगाव या २० ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्ग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
यावेळी महसूल अधिकारी, कर्मचारी, सर्व मंडळ अधिकारी, तलाठी तसेच तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.