धरणगाव तालुक्यात गंगापूर गावाजवळील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव ते बाभूळगाव एसटी बसमध्ये गंगापूर गावाजवळ अज्ञात चोरट्याने ५८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत लांबवल्याची घटना शुक्रवार दि. १८ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रंजनाबाई शिवाजी सावंत (वय ५८, रा. चमगाव ता. धरणगाव) यांनी फिर्याद दिली आहे. रंजनाबाई सावंत या शुक्रवारी दि. १८ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता धरणगाव ते बाभूळगाव एसटी बसमध्ये प्रवास करीत होत्या.(केसीएन) गंगापूर गावाजवळ अज्ञात इसमाने ६५ हजार रुपये किमतीची १८ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत त्यांच्या गळ्यातून नकळत चोरी करून गायब झाला. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशन येथे रंजनाबाई सावंत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रदीप पवार हे करीत आहेत.