जळगाव तालुक्यातील आमोदा बुद्रुक येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आमोदा बुद्रुक येथे गिरणा नदीच्या किनारी शनिवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास एका पुरुष जातीचा सांगाडा सापडल्याप्रकरणी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आमोदा बुद्रुक गावचे पोलीस पाटील यांना ग्रामस्थांनी नदीकिनारी सांगाडा असल्याची माहिती दिली. पोलीस पाटलांनी तालुका पोलीस स्टेशनला कळवून खबर दिली. यानंतर जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे एपीआय अहिरे, हेकॉ किरण आगोणे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. तसेच, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करण्यात आपले. मोबाईल फॉरेन्सिक टीमने डीएनएसाठी सांगाड्यावरील नमुने घेऊन राखीव केले आहेत.
तर इतर तपासासाठी सांगाडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या सांगाड्याचे अंदाजित वय ६० ते ६५ असून डोके, छातीचा भाग, एक हात, एक पाय मिळून आला आहे. अंगावरील कपड्यांचे तुकडे सापडले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय अहिरे तपास करीत आहेत. सांगाडा सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.









