पारोळा तालुक्यातील टिटवी येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील टिटवी येथील २६ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संपत तुळशीराम भिल (२६) असे मयत इसमाचे नाव आहे. तो टिटवी गावात परिवारासह राहत होता. गुरुवारी त्याच्या घराच्या छतास लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने संपत भिल याने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच नातेवाइकांसह गावातील ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णालय येथे आणले. डॉक्टरांनी तपासून संपत भिल याला मयत घोषित केले. याबाबत पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोना जयंत सपकाळे करीत आहेत.