पाचोरा पोलीस स्टेशनची कारवाई
पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा-गिरड रोडवर अनधिकृतपणे देशी दारूची वाहतूक करताना पोलिसांनी १ लाख ६५ हजारांच्या मुद्देमालासह एकास अटक केली. दिनांक १८ रोजी दुपारी १२ वाजता ही कारवाई करण्यात आली. पाचोरा पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई केली.
गुप्त माहितीनुसार, गोविंद दतू पुजारीअनधिकृतपणे देशी दारूची वाहतूक (वय ३९, रा. शिवाजी नगर, पाचोरा) हा त्याच्याकडील मारुती कंपनीची स्वीप्ट गाडी क्रमांक (एमएच-१४-बीके-५१८५) मध्ये टैंगो पंच कंपनीचे दारुचे खोके भरुन गिरड रोड मार्गे वाहतूक करीत होता. त्यास गो. से. हायस्कूलसमोर दुपारी १२.३० वा. नियुक्त पोलीस पथकाने थांबविले. स्वीप्ट गाडीचालकास वाहनात काय माल आहे याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी या वाहनाची पाहणी केली. वाहनात अनधिकृत दारू आढळली. १५ हजारांची विनापरवाना दारू आणि दीड लाखांची वाहन जप्त करण्यात आली आहे.
मुद्देमालासह संशयित आरोपी गोविंद दत्तू पुजारी यास ताब्यात घेत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी हे करीत आहेत. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील ताराचंद पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक हटकर, पोहेकॉ/राहुल काशिनाथ शिंपी यांनी ही कारवाई केली.