जळगाव ;- कुसुंबा शिवारातील मकरा यांचे वोल कंपाऊडलगत असलेल्या एका पत्र्याचे शेडमध्ये २३ रोजी जनावरांची कत्तल करुन उर्वरीत मांसांचे तुकडे, कातडी व शिंग सदर ठिकाणी टाकुन लोकांच्या संसर्गाला कारणीभूत ठरलेल्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोना ललीत केशव गवळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता
कुरेशी इकबाल शेख गफुर, वय 48 वर्ष, रा 21, इस्लाम पुरा, भवानी पेठ, यास २ रोजी सकाळी अटक करण्यात आली आहे . पोलीस निरीक्षक विनायकराव लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क फौजदार आनंदसिंग पाटील यांच्यासह पथकाने केली .