पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला सन्मान
जळगाव (प्रतिनिधी) : येथील पंचायत समिती शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी तथा ग. स. सोसायटी संचालक विजय शांतीलाल पवार यांचा तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत टोबॅको फ्री इंडिया राष्ट्रीय स्तरावरील अवार्डमिळाल्या बद्दल पालकमंत्री व पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तंबाखूमुक्त शाळा अभियानात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार सह रोख २५ हजारचे पारितोषिक मिळाल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विजय पवार यांचे विशेष कौतुक केले.जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आ. सुरेश भोळे, डायट प्राचार्य डॉ अनिल झोपे, शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील, जळगाव पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी सरला पाटील, प्रशासन अधिकारी खलील शेख, जितेंद्र चिंचोले, शिक्षक सेना अध्यक्ष नरेंद्र सपकाळे, ग. स. संचालक ज्ञानेश्वर सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. जळगाव तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांच्यासह शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.