• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘क्लासवन’ नोकरीचे आमिष देऊन अर्ज भरण्याचे काम दिले, तरुणीच्या आईला साडेदहा लाखांना गंडा !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव शहरातील घटनेत महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील नेहरूनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेला तिच्या मुलीला तहसीलदार म्हणून नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून तसेच शासकीय योजनेचा अर्ज भरण्याच्या नावाखाली लोकांकडून गोळा केलेले पैसे आणि घरातील दागिने व रोकड असा एकूण तब्बल १० लाख ५३ हजार ९५० रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्पना आत्माराम कोळी (वय-५३, रा.नेहरूनगर जळगाव) यांची ज्योती अशोक साळुंखे (रा.मन्यारवाडा जळगाव) नावाच्या महिलेशी एका कार्यक्रमात ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यावर ज्योती साळुंखे हिने कल्पना कोळी यांना त्यांची मुलगी वैशाली कोळीला तहसीलदार म्हणून नोकरीला लावून देण्याचे प्रलोभन दाखवले. यावर विश्वास ठेवून कल्पना कोळी यांनी वेळोवेळी ज्योती साळुंखे यांना एकूण ४ लाख २२ हजार रुपये रोख दिले. त्यानंतर आणखी पैशांची मागणी झाल्यावर कल्पना कोळी यांनी आपल्या घरातील ३ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिनेही ज्योती साळुंखे यांना दिले.

ज्योती साळुंखे हिने कल्पना कोळी यांची मुलगी वैशाली कोळी यांनाही शासकीय योजनेच्या अर्ज भरण्याच्या कामात गुंतवले. एका अर्जामागे १०० रुपये मिळतील, असे सांगून वैशाली यांच्याकडून तब्बल ५६० लोकांकडून अर्ज भरून घेतले आणि त्यापोटी जमा झालेले ३ लाख ५१ हजार ९५० रुपये स्वतः घेतले. अशा प्रकारे ज्योती साळुंखे हिने कल्पना कोळी आणि त्यांच्या मुलीकडून एकूण १० लाख ७३ हजार ९५० रुपये उकळले. कालांतराने जेव्हा मुलीला नोकरी लागली नाही, तेव्हा कल्पना कोळी यांनी ज्योती साळुंखे यांच्याकडे विचारणा केली. मात्र, ज्योती साळुंखे यांनी पैसे परत देण्यास स्पष्ट नकार दिला आणि कल्पना कोळी यांना शिवीगाळ करत धमकी दिली.

“माझी वरपर्यंत पोहोच आहे, तुम्ही जर माझ्याकडे आलात तर तुमचे हातपाय तोडून तुम्हाला संपवायलाही कमी करणार नाही,” अशा शब्दांत तिने कल्पना कोळी यांना धमकावले. या सर्व प्रकारानंतर हताश झालेल्या कल्पना कोळी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन ज्योती अशोक साळुंखे यांच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र तावडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

दुधाच्या भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

भुसावळ रेल्वे मंडळात ११२ सहाय्यक लोकोपायलट सेवेत दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळ रेल्वे मंडळात ११२ सहाय्यक लोकोपायलट सेवेत दाखल

भुसावळ रेल्वे मंडळात ११२ सहाय्यक लोकोपायलट सेवेत दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon