पाचोरा तालुक्यातील पिंप्री सार्वे गावात घडली होती घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंप्री सार्वे गावातील एका घरातून ४ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना सोमवारी ७ एप्रिल रोजी उघडकीला आली आहे. याबात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलीसांनी अवघ्या २४ तासात चोरट्याला अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेले दागिने जप्त केले आहे.
पाचोरा तालुकयातील सातगाव डोंगरी पासून ४ किलोमीटर अंतरवर असलेले पिंप्री सार्वे गावात आनंदा विठ्ठल पाटील हे वास्तव्याला आहेत. त्यांच्या घराच्या पत्र्याच्या खोलीतून चोरट्याने ६ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. ही घटना सोमवारी ७ एप्रिल रोजी सकाळी उघडकीला आली. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना पोलीसांनी त्यांच्या घराच्या शेजारी राहणारा राजेंद्र किसन पाटील (वय ४२) याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे, दहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस आणि चांदीचे पायातील पैंजण असा सुमारे ४ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई सपोनि प्रकाश काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि प्रकाश पाटील, हेकॉ नरेंद्र नरवाडे, अमोल पाटील, नामदेव इंगळे, इम्रान पठाण यांनी केली आहे.