जळगाव ;- दोन टप्प्यात घेण्यात आलेल्या कोव्हीड १९ रुग्णालयातून घेतलेल्या एकूण ७० रुग्नांचे तपासणी अहवाल आज दुपारी प्राप्त झाले असून १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत . यात पहिल्या टप्प्यातील ५६ अहवालांपैकी ९ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह तर १४ जणांच्या दुसर्या टप्प्यातील अहवालातून १ कोरोनाबाधित असे एकूण १० कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत . यात जळगाव ग्रामीण १ ,( कुसुंबा) , जळगाव शहर ४ , चोपडा १, भुसावळ ४ , अशा रुग्नांचा समावेश आहे . सकाळी जिल्ह्यातील खासगी प्रयोगशाळांच्या तपासणी अहवाल आज सकाळी प्रशासनाला प्राप्त झाला असून त्यानुसार जिल्ह्यात १८ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते .