आ. मंगेश चव्हाण यांनी केले रक्तदान
चाळीसगाव (प्रतिनिधी) : श्रीराम नवमी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती वर्ष व भाजपा स्थापना दिन औचित्याने चाळीसगाव येथे रविवारी दि. ६ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन आ. मंगेश चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी स्वतः आ. चव्हाण यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.
यावेळी भारतमाता, पंडित दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सदर प्रसंगी चाळीसगाव ग्रामीण व शहर मंडळ आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी रक्तदात्यांना माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी व जीवन सुरभी ब्लड बँक तर्फे प्रमाणपत्र देण्यात आले.