गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम
जळगाव: जागतिक आरोग्य दिन २०२५ च्या निरोगी सुरूवात आशादायक भविष्य या जागतिक आरोग्य संघटनेच्या थीमनुसार गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाने नशिराबादेत विविध उपक्रमातून जनजागृती हाती घेतली.
नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमांतर्गत, बीएससी नर्सिंग विद्यार्थ्यांनी उष्माघात, पोषक आहार, ओआरएस सोल्यूशनची तयारी आणि डीहायड्रेशन यांसारख्या विषयांवर पोस्टर प्रेझेंटेशन आणि नाट्यरूप सादरीकरणाद्वारे उपस्थितांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. करिष्मा जैन, प्रशासकीय अधिकारी तडवी , सीएचओ शोएब, तसेच कर्मचारी,गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमधून कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचे विभाग प्रमुख प्रा. निर्भय मोहोळ, फंडामेंटल ऑफ नर्सिंगचे विभाग प्रमुख प्रा. पियुष वाघ, प्रा. रश्मी टेंभुर्णे, प्रा. स्वाती गाडेगोनें, प्रा. प्रियंका गवई, प्रा. गिरीश खडसे, प्रा. आश्लेषा मून, प्रा. दीक्षा अडकणे, प्रा. सुमित भारंबे, प्रा. रोशनी भगत, प्रा. श्रुती सपाटे प्रा डीव्हायना पवार, प्रा रितेश पडघन आणि विशेष सूत्रसंचालक प्रा. अभिजीत राठोड उपस्थीत होते. कार्यक्रमाला आशा वर्कर, रुग्णांचे नातेवाईक आणि गावकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.