जळगाव ;- जिल्ह्यात आजपर्यंत २ पोलीस अधिकारी आणि २३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली असून यापैकी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर आलापी कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या कोरोना योद्धा अर्थात पोलिसही या विषाणूच्या संसर्गातून सुटलेले नाहीत . त्यांच्यावरही ड्युटीचा ताण असताना परिवाराला सांभाळणे कठीण होऊन बसले असतानादेखील ते आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडीत आहे . सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार २५ पोलीस अधिकारीसह पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची आतापर्यंत लागण झाली आहे. त्यामुळे कोव्हिड योध्यांना अर्थात पोलिसांना आता काळजी घ्यावी लागणार आहे .