पहुर- जामनेर तालुक्यातील पहूर येथे कोविंड सेंटरला आज सकाळी ११ वाजता प्रांताधिकाऱ्यांनी श्रीमती दीपमाला चौरे यांनी भेट देऊन कोविड सेंटरला पाहणी केली . यावेळी जामनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एकनाथ लोखंडे मंडळ अधिकारी प्रशांत निंबाळकर पहुर गावचे तलाठी सुनील राठोड कोतवाल भानुदास वानखेडे सरपंच पती शंकर घोंगडे माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे ग्राम विस्तार अधिकारी म्हस्के भाऊसाहेब ग्रामपंचायत कर्मचारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते . या सेंटरला भेट देऊन दिलेल्या आर टी लेले हायस्कूल तसेच महावीर पब्लिक स्कूल या दोन्ही कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली याठिकाणी कोराना रुग्णांची उत्तम व्यवस्था असल्याचे त्यांनी सांगितले.