शिरसोली (वार्ताहर) : माध्यमिक शिक्षण विद्या मंडळ शिरसोली ,संचलित बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील वसंत शंकर भारुडे हे नाईक पदावरून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. विद्यालयात ४० वर्ष प्रदीर्घ सेवा प्रामाणिकपणे पूर्ण केली.
त्यांना माध्यमिक शिक्षण विद्या मंडळ संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच सर्व संचालक मंडळ यांनी सपत्नीक हृद्य सत्कार करण्यात आला. तर विद्यालयाचे मुख्याध्यापक, व पर्यवेक्षक तसेच शालेय परिवारातर्फे देखील त्यांना निरोप देण्यात आला. सदर निरोप समारंभाला नातेवाईक, आप्तेष्ट व गावातील प्रतिष्ठित मित्र वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.