जिल्हा कृषी विभागामार्फत रावेर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनीधी) : जिल्ह्यातील रावेर, यावल हि तालुके केळी उत्पादनाचे तालुके म्हणून राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांची ओळख सर्वांना आहे. या पीकावर अनेकवेळी वेगवेगळी संकटे येत असतात. त्यात प्रामुख्याने वादळ, पुर, अति प्रमाणात तापमान, नैसर्गिक आपत्ती – कधी असमानी तर कधी सुलतानी मात्र या साऱ्या संकटांना सामोरे जात असतांना आता पनामा नावाच्या रोगाने या पिकांवर धुमाकूळ घातला आहे . याला आळा घालण्यासाठी कृषी विभाग वेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांशी सव्वाद साधुन बैठका व मेळावे आयोजित करून, रोग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
शेतकरी दत्तायत्र फालक यांच्या शेतात केळीवर पनामा रोगाची लक्षणे आदळून आली असुन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या रोगावरील उपाययोजनेसाठी सर्व शेतकऱ्यांना एकत्रीत चर्चासत्राचे आयोजन विठ्ठल मंदीर येथे घेण्यात आले. जळगाव येथील केळी संशोधन वनस्पती रोग शास्त्रज्ञ व्ही. टी. गुजर, डॉ. प्राजक्ता वाघ यांनी पनामा रोग व त्यावरील उपाय या वरती शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
अशी आहेत लक्षणे
सुरुवातीला या रोगाचा प्रादुर्भाव केळीच्या फळांमध्ये बुरशीची वाढ झाल्यामुळे पाण्याचे वहन पानापर्यत होत नाही. त्यामुळे पाने पिवळी होवून खाली झुकतात. आणि स्कर्ट सारखा आकार तयार होतो. त्यामुळे खोड फाटते. झाड खाली पडते. त्यामुळे हा बुरशीजन्य आजार असुन अतिशय घातक असा रोग आहे. याचे उच्चाटन करण्यासाठी एकात्मिक पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे असे डॉ गुजर यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
ह्या करा उपाययोजना
कार्बनडाझीम टेबुकोनाझोल या बुरशीनाशकांचा वापर करावा तसेच जैविक बुरशीनाशके ट्रायकोडर्मा, प्लासीलोमायसिस बॅसीलस सुडोमोनास प्लोरोसन्स मायकोरायझा यांचा जास्तीत जास्त वापर करावा तसेच शेताच्या बांधावर १० ग्रॅम प्रती लिटर पाण्यात पॉलीडायमेथील अमोनीयम क्लोराइडचे द्रावण बनवून यांचा शेती अवजारे, पादत्राणे यांच्यावरती निर्जंतुकीकरण करावे. जळगाव जिल्हातील सहा गावाचे केळीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. बनाना क्लस्टरच्या माध्यमातुन केळीपिक तसेच पनामा रोगावरील उपययोजना करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी सांगितले. यावेळी तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, खिर्डी खुर्द सरपंच राहुल फालक, खिर्डी बु चे सरपंच पती भास्कर पाटील, धामोडी, भांगलवाडी, शिंगाडी व तालुक्यातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.