जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. जमावबंदीत रात्रीची वेळ निश्चित करून दिली आहे. किराणा दुकान व मेडिकल वगळता अन्य आस्थापने बंद आहेत. असे असताना रविवारी रात्री १० वाजता काही हॉटेल सुरू असल्याचा प्रकार जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्या पाहणीतून उघडकीस आला. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजिंठा चौफुली जवळील हॉटल मुरली मनोहर, नेरी नाक्याजवळील नारखेडे हॉटल, कालिका माता चौकातील श्री गुरू रामदाणी फेमिली रेस्टॉरंट इत्यादी हॉटेल्स त्यांच्या पाहणीत सुरू असल्याचे दिसून आले. पोलीस अधीक्षक डॉ उगले यांनी तत्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात फोन करून कारवाईचे आदेश दिले.
पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, सहायक फोउजदर अतुल वंजारी, सहायक फोउजदर रामकृष्ण पाटील, सहायक फोउजदर आनंदसिग पाटील, पोलीस नाईक दीपक चौधरी, पोलीस कान्स्टेबल इम्रान सय्यद, पोलीस कान्स्टेबल हेमंत पाटिल यांचे पथक घटनास्थळी गेले सदर हॉटेल सुरू असल्याचे दिसून आल्यानंतर कारवाई करण्यात आली .
हॉटल मुरली मनोहरचा व्यवस्थापक लक्ष्मीनारायण उपाध्याय (रा गणपतीनगर), हॉटल कारागीर सुभाष महाजन, दयाकिसन भाट, मोहन सोनवणे, सोनुकुमार दिपासींग, प्रेम जोशी (सर्व रा.मुरली मनोहर हॉटल), हॉटल नारखेडेचा व्यवसथापक निलेश भावसार (रा. कासमवाडी), सुनील मराठे ,गुरू रामदाणी फेमिली रेस्टॉरंट व्यवस्थापक जसप्रीतसिग सहानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स.फौ. अतुल वंजारी हे करीत आहेत.







