प्रधान सचिवपदी सुनील वाघमोडे, रविंद्र चौधरी, दीपक मराठे यांची निवड
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी पुढील २ वर्षांसाठी निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. यात जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रल्हाद रामधन बोऱ्हाडे यांची तर जिल्हा प्रधान सचिवपदी सुनील हिरालाल वाघमोडे, रविंद्र युवराज चौधरी, दीपक मोतीराम मराठे यांची एकमताने निवड करण्यात आली.
जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच नूतन मराठा महाविद्यालयात घेण्यात आली. निरीक्षक म्हणून राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे (नाशिक) उपस्थित होते. तर मार्गदर्शक राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी, प्रा. डी. एस. कट्यारे, जिल्हाध्यक्ष नेमीवंत धांडे, उपाध्यक्ष नाना लामखेडे उपस्थित होते. मावळत्या कार्यकारिणीच्या कार्याचा गौरव करून निरिक्षक डॉ. गोराणे यांनी एकमताने निवड झालेल्या नूतन कार्यकारिणीला सदिच्छा दिल्या.
यानंतर नूतन जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. या कार्यकारिणीची मुदत दि. १ एप्रिल २०२५ ते दि. ३१ मार्च २०२७ अशी राहणार आहे. जिल्हा अध्यक्षपदी पुनश्च एकदा नेमिवंत धांडे (जळगाव) यांची निवड झाली. तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नाना नारायण लामखेडे (जामनेर),राजेंद्र बावस्कर (भुसावळ) यांची फेरनिवड झाली. तर अमळनेर येथील अशोक लोटन पवार यांचीही उपाध्यक्षपदी निवड झाली. इतर कार्यकारिणीत बुवाबाजी विभाग कार्यवाह : भीमराव चिंधू दाभाडे, महिला सहभाग कार्यवाह : शोभा प्रल्हाद बोऱ्हाडे, विविध उपक्रम विभाग कार्यवाह : जितेंद्र धनगर, युवा सहभाग विभाग : ॲड. सागर बहिरुणे, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प कार्यवाह : भाऊसाहेब साळुंके, सांस्कृतिक विभाग : प्रताप पाटील, मानसशास्त्र विभाग कार्यवाह : मिनाक्षी विश्वजीत चौधरी, कायदा व्यवस्थापन विभाग : ॲड. भरत मुरलीधर गुजर यांची निवड एकमताने झाली.