रावेर तालुक्यातील खिर्डी येथे शोककळा
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील खिर्डी येथील तरुणाच्या दुचाकीला पुणे येथे रावेत भागात ट्रॅक्टरने जबर धडक दिली. यात तरुण गंभीर जखमी होऊन तो जागीच मयत झाला. याप्रकरणी पुण्यातील रावेत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा होता. पश्चात पत्नी, आई, वडील, असा परिवार आहे. पुणे येथे अभियंता असलेल्या शुभम वसंत पाटील या ३० वर्षीय युवकाचा पुणे येथील रावेत भागात ६ रोजी आपघाती मृत्यू झाला. रात्री ११ च्या सुमारास ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने शुभम गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, काही वेळातच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, रावेत पोलिसात आरोपी ट्रॅक्टर चालक चंद्रशेखर ग्वानाप्पा मुदगल (वय २४, रा. मस्केवस्ती, रावेत) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.