जोशी महिला मंडळाच्या वतीने आयोजन
जळगांव (प्रतिनिधी) : वासुदेव जोशी कॉलनी येथील जोशी महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे माजी महापौर सीमाताई भोळे, डॉ. वैशाली जैन (स्त्री रोग तज्ञ), योगिता पाचपांडे (महिला पोलिस कॉन्टेबल), शैला चौधरी (समाजसेविका) या उपस्थित होत्या. प्रमुख महिला पाहुण्यांना सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच डॉक्टरांनी महिलांना कॅन्सर, मासिक पाळी, आहार यावर मार्गदर्शन केले.
महिला पोलिस यांनी सर्व महिलांना, सतर्क कसे राहावे, याबाबत मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी जोशी आणि राणी जोशी यांनी केले. आभार जोशी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुनम जोशी यांनी मानले. या वेळी समाजातील सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगिता जोशी, रोहिणी जोशी, दिपाली जोशी, वैशाली जोशी, मनीषा गोंधळी यांनी परिश्रम घेतले.