जळगाव — गोदावरी अभियांत्रिकीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स विभागाच्या वतीने एनईपी २०२०, हितधारकांसाठी जागरूकता आणि संस्थेच्या स्वायत्ततेसाठी संवेदनशीलता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा उत्सहात पार पडली.
दिनांक ५ मार्च २०२५ रोजी सेमीनार सभागृहात आयोजित कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक डॉ. एन. बी. चोपडे (उपसंचालक, पीसीसीओई पुणे),महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. प्रवीण फालक (उपप्राचार्य), शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. हेमंत इंगळे, आणि एनईपी समन्वयक डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक वर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक डॉ. एन. बी. चोपडे यांनी एनईपी २०२० अंतर्गत शिक्षण व्यवस्थेत होणारे परिवर्तन आणि संस्थात्मक स्वायत्ततेचे महत्त्व तसेच, संशोधन, नाविन्यता, आणि उद्योग सहकार्याच्या संधींवर प्रकाश टाकतांना एनईपी २०२० चा प्रभावामूळे नवीन शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षणात लवचिकता, बहुप्रवेश-बहुउत्सर्ग प्रणाली, कौशल्याधारित शिक्षण आणि संशोधनावर भर दिला जात आहे. संस्थात्मक स्वायत्तता अंतर्गत महाविद्यालये आणि विद्यापीठांना अधिक स्वायत्तता देऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या उपाययोजना यावर चर्चा झाली.उद्योग आणि शिक्षण यामधील समन्वय: विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगानुभव मिळावा यासाठी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.शैक्षणिक सुधारणा मूल्यांकन पद्धतीत सुधारणा, शिक्षक प्रशिक्षण आणि डिजिटल शिक्षणाची गरज यावर विचार विनिमय झाला.कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्रा. रेश्मा अत्तरदे यांनी प्रमुख वक्त्यांचे आणि उपस्थितांचे आभार मानले. त्यांनी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय भविष्यातही अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करत राहील आणि एनईपी २०२० प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्नशील राहील असे सांगितले.कार्यशाळेमुळे शिक्षण धोरणासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असून प्राध्यापकांना नव्या संधी आणि आव्हानांची जाणीव झाली. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील(सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य) व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षण क्षेत्रात नेतृत्व करत राहणारतसेच शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे आणि भविष्यातही अशाच नाविन्यपूर्ण कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित करून शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करेल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला.