नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – गेल्या तीन महिन्यांपासून सिलिंडरच्या दरात घसरण होत होती. मात्र, तेल विपणन कंपन्यांनी १ जूनपासून एलपीजीच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये सर्वसामन्यांना आणखी एक झटका बसला आहे.
विना अनुदानित १४ किलोच्या गॅसच्या किंमतीत राजधानी दिल्ली आणि मुंबईमध्ये ११ रुपये ५० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. तर कोलकात्यामध्ये ३१ रूपये ५० पैसे आणि चेन्नईमध्ये ३७ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे दिल्लीमध्ये १४ किलोंचा विनाअनुदानित गॅसची किंमत ५९३ रुपये झाली आहे. कोलकातामध्ये ६१६ रुपये तर चेन्नईमध्ये ६०६.५० रुपये झाली आहे. तर मुंबईत १४ किलोच्या विनाअनुदानिक गॅससाठी ५९०.५० रुपये मोजावे लागणार आहेत.