• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नवीन विकासकामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 1, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नवीन विकासकामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला आढावा

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात होत असलेल्या सर्व कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवावे तसेच नवीन रस्ते दर्जेदार असावेत यासाठी त्यांची गुणवत्ता चाचणी करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्हा नियोजन समिती मार्फत पीडब्ल्यूडी, पोलीस विभाग, नाविन्यपूर्ण, सिव्हील हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, अपारंपारिक उर्जा इतर मंजूर करण्यात आलेल्या १४१ कोटी ६३ लाखांच्या निधीतून ५०७ कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी शहरातील १०० कोटींच्या कामांबाबत सविस्तर आढावा अधीक्षक अभियंता पी.पी. सोनवणे यांनी सादर केला.

या बैठकीस आ. चंद्रकांत सोनवणे, आ. अमोल जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. जिल्ह्यातील ६८ मोठया विकासकामांपैकी ४० पूर्ण झाली असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. रामानंद पोलीस स्टेशन पूर्णत्वास येत असून १० पोलीस चौक्यांची कामे पूर्ण झाली आहेत. पशुवैद्यकीय विभागाच्या १६ पैकी १३ इमारतींची कामे अंतिम टप्प्यात आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्मारकाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.

महाराष्ट्रातील पहिले पशु रेतन केंद्र – जिल्हा नियोजन निधीतून हे अभिनव केंद्र उभारले जात असून त्याचे काम वेगाने सुरू आहे. भरोसा सेल इमारत, संविधान भवन बांधकाम, बहिणाबाई स्मारक, बालकवी ठोंबरे स्मारक, वारकरी भवन यांचे काम सुरु आहे. राज्यातील अनोख्या वारकरी भवनाच्या बांधकामालाही गती मिळाली असून लवकरच हे प्रकल्प पूर्ण होईल. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय हे ब्रिटिशकालीन वारसा इमारतींपैकी एक आहे. त्यामुळे त्याचा हेरिटेज दर्जा कायम ठेवत सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हेरिटेजच्या नियमांचे पालन करत कार्यालयाचे नूतनीकरण होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील परिसर हिरवाईयुक्त असा विकसित करण्यात येणार असल्याचे अधिक्षक अभियंता सोनवणे यांनी सांगितले. या सर्व प्रकल्पांच्या वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ततेसाठी संबंधित विभागांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.


 

 

Tags: #gulabrav patil #shivsena #jalgaon #mharashtra #bharat
Previous Post

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी दाखल गुन्ह्यात तरुणाला १० वर्षांचा कारावास

Next Post

कंपनीतून रोकड चोरून सीसीटीव्ही कॅमेरे फोडून नुकसान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

कंपनीतून रोकड चोरून सीसीटीव्ही कॅमेरे फोडून नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई
1xbet russia

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

May 7, 2026
आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस
1xbet russia

आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

May 7, 2026
अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण
1xbet russia

अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण

May 7, 2026
 दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; शहर पोलिसांत गुन्हा
1xbet russia

 दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; शहर पोलिसांत गुन्हा

May 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

May 7, 2026
आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

May 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon