पुणे (वृत्तसंस्था) – महापालिकेच्या कर आकारणी व कर संकल कार्यालयाकडे मिळकत कर (प्रॉपर्टी टॅक्स) भरणा दि. 31 मे 2020 अखेर थकबाकी असल्यास त्यासह संपूर्ण वर्षाचा मिळकत कर भरल्यास सर्वसाधारण करामध्ये 5 ते 10 टक्के सवलत दिली जाते. तर सर्वसाधारण कराची चालू मागणीची रक्कत 25 हजारांपेक्षा कमी असेल तर त्यांना कराच्या रक्कमेत 10 टक्के आणि ज्यांची कराची रक्कम 25001 पेक्षा जास्त असेल त्यांना 5 टक्के सूट दिली जाते. मिळकत कर भरण्याची अंतिम तारीख ही 31 मे पर्यंत होती. मात्र, ती आता वाढवण्यात आली आहे.
मिळकत कर भरण्यासाठी आज (३१ मे) शेवटचा दिवस असून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना दिलासा देण्यासाठी ही मुदत ३० जूनपर्यंत वाढण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश आपण महापालिका आयुक्त @SHEKHAR13563 यांना दिले आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीनं तसेच लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर पुणेकरांना दिलासा म्हणून महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासोबत मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी चर्चा केली आणि मिळकत कर भरण्याची तारीख 30 जून पर्यंत वाढवली. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मिळकत कर भरण्यास अडचण निर्माण झाल्याने सदर सवलतीपासून कोणी वंचित राहू नये म्हणून मिळकत कर भरण्याची तारीख ही 30 जून पर्यंत वाढवण्यात आली असल्याचे मनपा आयुक्त शेखर गायकवाढ यांनी परिपत्रकाव्दारे सांगितले आहे.