जळगाव शिवतीर्थ मैदानावर समाज बांधवांचा सहभाग
जळगाव (प्रतिनिधी) : येथील सुवर्णकार समाज क्रिकेट लीग आयोजित संत नरहरी महाराज चषक पर्व ६ चे आयोजन दि. ते २६ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग स्पर्धेत राहणार आहे.
सुवर्णकार समाजातील तरुण खेळाडूंसाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून ही स्पर्धा दरवर्षी भरवण्यात येते. सोमवारी दि. २४ रोजी टी-शर्ट आणि चषकाचे अनावरण करण्यात येणार आहे. तर स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी झाले आहेत. यंदा पर्व ६ आयोजित करण्यात आले आहे. ही स्पर्धा मैदानावर जळगाव येथे दिवस रात्र पद्धतीने खेळवली जाणार आहे. मुख्य प्रायोजक मीनाक्षी एंटरप्राइजेसचे रमेश धुडकूशेठ वाघ हे असून समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.