निवेदन देऊन महामंडळ लवकर सुरु करण्याची केली विनंती
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जळगाव जिल्हा जळगाव यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, शहराचे आमदार राजूमामा भोळे हे उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सुवर्णकार समाजाच्या आर्थिक प्रगतीच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलत, महाराष्ट्र शासनाने “श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार आर्थिक विकास महामंडळ” स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या महामंडळाच्या त्वरित अंमलबजावणीसाठी आणि समाजबांधवांना त्याचा लवकरात लवकर लाभ मिळावा, यासाठी महाराष्ट्र सुवर्णकार सेना यांच्या वतीने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय विसपुते, उपाध्यक्ष विजय वानखेडे, सचिव संजय पगार, मेळावा नियोजन समिती प्रमुख बबलू बाविस्कर.उपस्थित होते.