अमळनेर तालुक्यातील चौबारी येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील चौबारी येथे १९ रोजी घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील चौबारी येथील विवाहिता जागृती निलेश पाटील (वय २५) हिने राहत्या घरी लोखंडी कडीला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. मयत जागृती हिचे २०२१ मध्ये चौबारी येथील निलेश कैलास पाटील याच्याशी लग्न झाले होते व त्यांना दीड वर्षाची मुलगी आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ मुकेश साळुंखे करीत आहेत.