जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
याप्रसंगी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ.इम्रान पठाण, प्रशासकीय अधिकारी संजय चौधरी, अधीसेविका जयश्री जोगी, विजय पाटील, नरेंद्र वाघ, किरण बावस्कर, निलेश बारी, प्रदीप जयस्वाल, मनीषा मगरे, विजय बावस्कर, प्रकाश पाटील, महेंद्र पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी राजसिंग छाबरा व विद्यार्थी आदी उपस्थित होते.