चाळीसगाव न्यायालयाचा निर्णय
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – उसनवारीने घेतलेले पैसे परत करण्यासाठी दिलेला धनादेश बँकेत न वटल्याने दाखल प्रकरणात मेहुणबारेच्या माजी सरपंच संघमित्रा नरेंद्र चव्हाण यांना एक महिना कारावासासह फिर्यादीस २ लाख रुपये देण्याचे आदेश चाळीसगाव न्यायालयाने दिले आहे. हा निकाल शनिवारी देण्यात आला.
प्रतिभा अशोक देवरे यांनी संघमित्रा नरेंद्र चव्हाण यांना अडचणीच्या काळी उसनवार म्हणून १ लाख २० हजार रुपये दिले होते. ही रक्कम काही दिवसांनी संघमित्रा नरेंद्र चव्हाण या प्रतिभा अशोक देवरे यांना परत करणार होत्या. संघमित्रा नरेंद्र चव्हाण यांनी १ लाख २० हजारांचा धनादेश प्रतिभा अशोक देवरे यांना दिला. देवरे यांनी धनादेश स्वीकारून बँकेत टाकला असता तो वटला नाही. याविरोधात प्रतिभा देवरे यांनी चाळीसगाव न्यायालयात दाद मागितली. यावर न्यायालयाने संघमित्रा चव्हाण यांना १ महिना कारावासाची शिक्षा सुनावताना ८० हजार नुकसानभरपाईसह धनादेशाची १ लाख २० हजार रक्कम देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.