उर्वशीला रजत पदक, ५२ विद्यार्थ्यांचा सहभाग
शिरसोली (वार्ताहर) : गांधी रिसर्च फाउंडेशन, जैन उद्योग समूह जळगावतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेत बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले. विद्यालयातील एकूण ५२ विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता.
या परीक्षेचा निकाल दि.१० रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत विद्यालयातील इयत्ता ९ वी – ड ची विद्यार्थिनी उर्वशी रवींद्र पाटील या विद्यार्थिनीला रजक पदक मिळाले .परीक्षा समन्वयक म्हणून विद्यालयातील उपशिक्षिका भारती ठाकरे यांनी काम पाहिले. विद्यार्थिनीला मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोक अस्वार, उपाध्यक्ष दिलीप बारी, शालेय समितीचे चेअरमन कमलाकर तांदळे, संचालक तथा शालेय समितीचे सदस्य निलेश खलसे, सर्व संचालक मंडळ, तसेच मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, पर्यवेक्षक सुरेखा दुबे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे विद्यार्थिनीचा पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले.