जळगावात एकावर गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : गोदावरी संस्थेच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीचा महागडा मोबाईल आकाशवाणी चौकातून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुरुवारी ६ फेब्रुवारी सायंकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मधुरा मुकुंद कोले (वय -२१, रा. महाविद्यालयाचे गर्ल्स हॉस्टेल, जळगाव) ही वैद्यकीय शिक्षण घेत आहे. ती २८ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात थांबली होती. याच दरम्यान, संशयित आरोपी गजानन मोहन राठोड (वय ३५, रा. टाकळी, मुक्ताईनगर) याने तिचा २० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. घटनेनंतर तरुणीने स्वतःच्या स्तरावर शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र मोबाईल सापडला नाही. त्यामुळे अखेर तिने गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून गजानन राठोडविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहेत.