भुसावळ तालुक्यातील चोरवड येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील चोरवड गावात राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने राहत्या घरात विषारी औषध घेतल्याने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान रविवारी २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता मृत्यू झाला आहे. या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दीपक प्रल्हाद पाटील (वय-३०, रा. चोरवड ता. भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई सरूबाई, मोठा भाऊ संतोष आणि विवाहित तीन बहिणी असा परिवार आहे. (केसीएन)शेतीचे काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी २८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता त्याने गावातील विठ्ठल मंदिराजवळ विषारी औषध सेवन केले. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली, त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना रविवारी २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता त्याचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.