जळगाव (प्रतिनिधी) – स्फूर्ती बहुउद्देशिय संस्थेचा कार्यक्रम माय सक्सेस सेक्टरच्या कार्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा झाला. कार्यक्रमात संतोष वाणी मॅनेजर, जळगाव पिपल्स बँक सुरज जहांगीर चौधरी यांचा सन्मान माय सक्सेस सेक्टरचे चेअरमन मनोज येवले, यांच्या हस्ते करण्यात आला.या मान्यवरांच्या उपस्थितीत सीनेगीत स्पर्धेत माही सुर्वे,वैष्णवी रविंन्द्र कुलकर्णी,किरण प्रकाश महाजन, यांना अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. ब्युटीफुल फोटो स्पर्धेत अर्चना येवले,सुनीता अग्रवाल व कविता बावस्कर यांना अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
तर संस्थेच्या कार्यात सहकार्य केल्याबद्दल सिध्दार्थ जगताप,सोनी ज्ञानेश्वर पाटील,उज्वल महेन्द्र सिंघवी यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी आपल्या कलांचे सादरीकरण केले.आयोजन सुञसंचालन स्फूर्ती बहुउद्देशिय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष पल्लवी भोगे (पाटील) यांनी केले. यशस्वीतेकरिता वर्षा सगणे,दिव्या मोरे यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.