• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मुख्यमंत्री घरात, शेतकरी मृत्यूच्या दारात : आ. महाजन यांची उद्धव ठाकरेंवर कठोर टीका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 9, 2020
in जळगाव
0

भाजपने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान मोर्चा

जळगाव (प्रतिनिधी) – राज्यामध्ये आग लागू द्या पण मुख्यमंत्री आज घरात बसून आहेत. त्यांना राज्यातील प्रश्नांशी काही घेणेदेणे नाही. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” हे फक्त उद्धव ठाकरे यांच्या घरापुरता मर्यादित आहे. राज्यात हाहाकार माजला. कोरोना आला. पूर आला. मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडले नाहीत. ते म्हणतात, कॉम्प्यूटर कशासाठी आहे ? या कॉम्प्युटरवर मला सर्व रिपोर्ट मिळतात. आता अशा मुख्यमंत्र्यांना काय म्हणायचे ? अशी घणाघाती टीका माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी जळगावात केली.

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात व शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सोमवारी ९ नोव्हेंबर रोजी भाजपतर्फे किसान मोर्चा काढण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच आकाशवाणी चौकात बैलगाडी, ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ रोखण्यात आला. यावेळी माजी मंत्री आ.गिरीष महाजन, जिल्हा अध्यक्ष आ . सुरेश भोळे , खा. उन्मेष पाटील, खा. रक्षा खडसे, आ. संजय सावकारे, आ. मंगेश चव्हाण, आ. चंदुलाल पटेल, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, महापौर भारती सोनवणे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आ. स्मिता वाघ, सुरेश धनके, पोपट भोळे, मच्छिन्द्र पाटील, नंदकिशोर महाजन, ललिता श्याम पाटील आदी उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यातील केळी पिक विमा निकष बदलवून पूर्वी प्रमाणे मिळण्याबाबत व गेल्या २ महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे झालेली शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्यातर्फे भव्य किसान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. रक्षा खडसे, खा. उन्मेष पाटील यांनी त्यांच्या मनोगतात ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका करीत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिकारी, मंत्री विचित्र उत्तरे देतात असे म्हणत टीका केली.

यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, मागील मुख्यमंत्री आठवा, देवेंद्र फडणवीस यांनी हमीभावाने शेतकऱ्याला दर दिला. विविध पिके घेतली. शेतकऱ्याला न्याय दिला. ते ३६ जिल्हे फिरत आहेत, तुम्ही का नाही फिरू शकत असे म्हणत आताच्या सरकारने शेतकऱ्यांचे हरभरा, तूर काहीच घेतले नाही अन उद्धव ठाकरे म्हणतात शेतकऱ्यांना चिंतामुक्त करेन. अरे शेतकऱ्यांना ठार मारायचे काम हे सरकार करीत आहे अशा शब्दात टीका केली. पुढे ते म्हणाले की, विद्यार्थ्यांचे विद्यालयात प्रवेश होत नाही. नोकऱ्या मिळत नाही. मागच्या वर्षी केरळला पाऊस झाला. तेथे आम्ही औषधी आणि डॉक्टर घेऊन गेलो. कोल्हापूर, सांगली, सातारा येथे पूर आला त्या ठिकाणी आम्ही चक्क पाण्यात उतरून, जेथे घातक मगर होत्या तेथे उतरून आम्ही वैद्यकीय सेवा पुरविली. लोकांचे मदत कार्य केले आणि या ठिकाणी मुख्यमंत्री गुडघाभर पाण्यात सुद्धा उतरायला तयार नाहीत अशा मुख्यमंत्र्यांना म्हणायचं काय अशा शब्दात कठोर टीका केली.


 

Previous Post

WhatsApp चा ‘या’ 5 लेटेस्ट फीचर्सबद्दल जाणून घ्या

Next Post

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !
1xbet russia

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !

June 30, 2025
रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान
1xbet russia

रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

June 30, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon