नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोनानंतर अनेक जणांना म्युकरमायकोसिस आजाराचा सामना करावा लागत आहे. या आजाराचे उपचारही कोरोनासारखेच महागडे आणि औषध टंचाईचे आहेत. यामुळे ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी म्युकरमायकोसिसच्या उपचार पद्धतीचा कमी खर्चाचा पर्याय सुचविला आहे. कोरोना नंतर म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या रुग्णांचा एका दिवसाचा खर्च हा जवळपास 35000 रुपये आहे. जो 100 पटींनी कमी होऊन 350 रुपये एवढाच होऊ शकतो. डॉक्टरांनी ब्लॅक फंगसवर उपचाराचा एक पर्याय सुचविला आहे. यामध्ये सावधानतेने रुग्णाच्या रक्तातील क्रिएटिनिन लेव्हलवर लक्ष ठेवावे लागणार आहे. यामुळे उपचाराचा खर्च कमी होणार आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाचे ईएनटी विभागाचे विभागप्रमुख डॉ. समीर जोशी यांनी या उपचार पद्धतीने अनेक रुग्ण बरे केलेत.