अमरावती ( प्रतिनिधी ) – मल्टी टास्क फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘माय रमाई’ या मराठी गीताचे पहिल पोस्टर जागतिक महिला दिनानिमित्त सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले.
हे गीत लोकप्रिय गायिका सोनाली सोनवणे यांनी गायले असून श्रीमती ललित वानखडे यांनी लिहिलेल्या या गीताला संगीत चेतन ठाकूर यांनी दिले आहे .
निर्माता श्रीहरी सरदार , दिग्दर्शक सागर भोगे, सह दिग्दर्शक आशिष सुंदरकर , छायांकन व संकलन किर्तीनंदन इंगोले, सह छायांकन हर्षल वावरे, प्रवीण ठाकरे , रंगभूषा प्रशांत तालखंडे , कला दिग्दर्शन सुधीर पेंडसे यांनी केले आहे . प्रोडक्शन टीम अमोल कोयकर, विशाल वानखडे, भूषण जोंधळे, अक्षय नगराडे, हिमांशू सरदार तसेच प्रमुख कलाकार वैष्णवी डवरे, विनय भगत , बाल कलाकार यश वाकडे आहेत . लवकरच माय रमाई मराठी गीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असं दिग्दर्शक सागर भोगे यांनी सांगितलं.