जळगांव (प्रतिनिधी) – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अरिहंत अकॅडेमी व सोनाळकर अकॅडेमी येथे ‘स्त्रीवाद’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेचे आयोजन सोनाळकर अकॅडेमीचे संचालक कबीर वासंती शेखर, अरिहंत अकॅडेमीचे केंद्रप्रमुख वृषाली पाटील , प्रा मयूर बदामे यांनी केले.या स्पर्धेत 11 वी,12वी, JEE, NEET, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. लहान गटात प्रथम पारितोषिक आयुषी पाटील, द्वितीय साक्षी बडगुजर तसेच खुल्या गटात प्रथम कार्तिकी पाटील यांनी क्रमांक पटकवला. स्पर्धेचे परीक्षण रत्नप्रभा साबळे व निकिता अग्रवाल यांनी केले.
विनोद चौधरी, विजय सोनवणे,रिचा रडे,विद्या परदेशी, दिपाली भालेराव यांनी परिश्रम घेतले.