जामनेर ( प्रतिनिधी ) – शहरातील दत्तमंदिरातील परिसरात खान्देश तेली समाज महिला मंडळ स्थानिक शाखेतर्फे महिला दिनानिमित्त कष्टकरी महिलांचा सन्मान या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन होत्या . प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक लीना पाटील, वैशाली भोंडे , खान्देश तेली महिला समाज जिल्हा कार्याध्यक्ष वैशाली चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कष्टकरी महिला आशा सोनार , जया घोरपडे , छाया , गुंफाबाई , शोभाबाई सोनवणे , ताराबाई सुरवाडे , सविता दोडके , बेबाबाई विसपुते , पत्रकार मिनाबाई शिंदे यांचा शाल, पुष्प गुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला प्रास्ताविक व सूत्रसंचालन खानदेश तेली महिला समाज कार्याध्यक्ष वैशाली चौधरी यांनी केले तर आभार माधुरी चौधरी यांनी मानले.
या वेळी शितल चौधरी, ललिता कुरकुरे , सुनिता महाजन, सुनिता दुसाने, मनीषा लोखंडे, सविता भगवान दोडगे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.