• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

निर्भया पोलीस पथकातर्फे जी. एच. रायसोनी महाविद्यालयात विद्यार्थिनींना “स्वसंरक्षणाचे धडे”

महाविध्यालयातील महिला सन्मान सप्ताहात राबविला उपक्रम ; महिला पोलीस मंजुळा तिवारी यांच्याकडून प्रशिक्षण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 9, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – समाजकंटक, रोडरोमियोंचा मुकाबला करण्यासाठी त्याचबरोबर स्‍वरक्षणासाठी जिल्हा पोलीस दलाच्या निर्भया पथकातील एपीआय मंजुळा तिवारी यांनी जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात “जागतिक महिला दिन’ अंतर्गत सुरु असलेल्या महिला सन्मान सप्ताहात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. यात स्वरक्षण करण्यासाठी लाठीचा वापर, ऐनप्रसंगी घ्यावयाची दक्षता, अडचणींच्या प्रसंगात स्वतःचा बचाव करता यावा, यासाठी मुलींना स्व-सरंक्षण व त्यांचे तंत्रे यासंदर्भात त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. महाविद्यालयात महिला दिनानिमित्त संपूर्ण सप्ताहात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना नमूद केले कि, लग्नानंतर दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणून अगदी लहानपणापासून मुलींना स्वयंपाकाचे, शिवणकलेचे, व्यावहारिकतेचे धडे दिले जातात. या सगळ्या धडय़ांना छेद देत आज स्त्रियांबरोबर ज्या घटना देशभरात घडत आहेत ते पाहता त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देणे जास्त गरजेचे आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात महिला पोलीस मंजुळा तिवारी म्हटल्या कि, कोणी तुमची छेड काढण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर तुटुन पडा आणि त्याला अद्दल घडवत खेचत पोलीस ठाण्यात आणण्याची धमक ठेवा, आजच्या तरुणींना मर्दानी प्रमाणे धडाकेबाज होण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच जळगावमधे निर्भया सेल ची स्थापना करण्यात आली असुन या माध्यमातून शहरातील महिला आणि तरुणींसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याचा प्रयत्न जळगाव पोलीस करणार असल्याचं मंजुळा तिवारी यांनी सांगितलं. यानंतर या कार्यक्रमात सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील व पोलीस कोस्टेबल अरविंद वानखेडे यांनी “सायबर सुरक्षितता आणि जागरूकता” याविषयावर सखोल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी प्रा. श्रेया कोगटा, प्रा. ज्योती जाखेटे व प्रा. प्रिया टेकवानी यांनी सहकार्य केले तसेच सूत्रसंचालन संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील यांनी तर आभार बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.


 

Tags: #bhraysoni mahavidyalay news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महिलेवर अत्याचार ; रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

भडगांव येथे जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन शिबिर संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भडगांव येथे जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

June 21, 2025
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon