जळगांव ( प्रतिनिधी ) – स्त्री संसाधन केंद्र महानगरपालिका मार्फत अमलबजावणी करण्या करिता शासन निर्णय २०१९/प्र.क्र.७५ का.१०अंतर्गत स्त्री संसाधन केंद्र जळगांव महानगरपालिके तर्फे महिला व बाल कल्याण विभागा मार्फत सुरू करण्यात येणार आहे.
ही समिती केंद्राच्या प्रभावी अंमलबजावणी करण्या करिता मनुष्यबळ नियुक्ती करण्याकरिता जळगांव शहर महानगरपालिका महिला बाल कल्याण विभाग तर्फे स्त्री संसाधन केंद्र समिती गठीत करण्यात आली. नागरी समाज संघटनेचे प्रतिनिधी म्हणून निवेदिता ताठे, मनिषा पाटील, सामाजिक संस्थेच्या वतीने मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, मराठी प्रतिष्ठानचे अँड. जमील देशपांडे, आर्या फाऊंडेशनच्या सौ. छाया पाटील यांची समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली. निवडपत्र श्याम गोसावी यांच्या हस्ते देण्यात आले . यावेळी महिला बाल कल्याण विभागाचे निरीक्षक पांडुरंग पाटील उपस्थित होते.