मुंबई (वृत्तसंस्था) – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी आढळून आलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या या प्रकरणामध्ये सध्या पोलीस दलातून बरखास्त केलेले सचिन वाझे हे मुंबईच्या तळोजा जेलमध्ये आहेत. मागील काही दिवसापासून ते सीबीआय चौकशीत होते. आता मात्र सचिन वाझे यांची चौकशी सक्तवसुली संचालनालय (ईडी) करणार आहे. (गुरुवारी) 8 जून रोजी तळोजा तुरुंगात चौकशी करण्याची परवानगी विशेष पीएमएलए कोर्टाने ED ला दिली आहे. यानुसार ED आता वाझेची चौकशी तळोजा तुरुंगात जाऊन करणार आहे.
काही दिवसापूर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ED) राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर तपासणीनंतर दोन्ही सचिव संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना त्यावेळी अटक करण्यात आले. अटकेनंतर त्यांची चौकशी करण्यात आली. सचिन वाझेनी मुंबईतील हॉटेल बार मालकांकडून तब्बल 4 कोटी 70 लाख रुपये वसूल करून 2 हप्त्यांमध्ये शिंदे यांच्याकडे दिले होते, याबाबत कबुली देशमुख यांचे सचिव कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांनी दिल्याचा दावा ED कडून करण्यात आला आहे.
या दरम्यान, अनिल देशमुखांच्या सचिवांना 70 लाख रुपये दिले होते, असा धक्कादायक खुलासा सचिन वाझेने जबाबात नोंदवला आहे. अनिल देशमुख थेट आदेश द्यायचे असे देखील सचिन वाझेनं आपल्या जबाबात म्हटलं होतं. तर याच जबाबानुसार सचिन वाझेची चौकशी करायची असल्याने वाझे तळोजा तुरुंगात आहेत. आणि तुरुंगात जाऊन चौकशी करण्याची परवानगी ED ला मिळावी आहे. याबाबत विनंती अर्ज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला होता. ED चा अर्ज कोर्टानं ग्राह्य धरला आहे.