मुंबई (वृत्तसंस्था) – भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून त्यात १० नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेवर सर्वच स्तरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रुग्णालयाला भेट दिली. या संदर्भात मंत्री देशमुख यांनी ट्विट करून माहिती दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याआधी देखील ट्विट करून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. या घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. आता त्यांनी रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली.
आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथील रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच डॉक्टर आणि नर्सची चर्चा करून घटनेची माहिती घेतली. या संदर्भातील व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील नवजात शिशु केअर युनिटमध्ये मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. यामध्ये धुरामुळे गुदमरुन 10 बालकांचा मृत्यू झाल्याचे समजते. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात बालकांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.







