पहूर ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यातील लोंढरी येथील माहेर असलेल्या विवाहितेने घर घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणावे म्हणून छळ करणाऱ्या सासरच्या लोकांविरीधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील लोंढरी येथील माहेर असलेल्या भाग्यश्री मुकेश मोरे (वय-२५) यांचा विवाह उल्हासनगर ठाणे येथील मुकेश आत्माराम मोरे यांच्यासह झाला. लग्नाच्या दोन महिन्यानंतर पती मुकेश याने अपार्टमेंटमध्ये घर घेण्यासाठी माहेरुन ५ लाख रुपये आणावे यासाठी मागणी केली. परंतु विवाहितेने पैशांची पूर्तता न केल्यामुळे पतीकडून शिवीगाळ व मारहाण सुरु झाली. त्यानंतर सासरे सासू, सासरे, जेठ आणि ननंद यांनी देखील पैशासाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. ८ एप्रिल रोजी सायंकाळी पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून पती मुकेश मोरे, सासरे आत्माराम मोरे, सासू सुशिलाबाई मोरे, जेठ राजेश मोरे ( सर्व रा. उल्हासनगर, ठाणे), ननंद ज्योती मिस्तरी (रा. उधना सुरत ) आणि मेघा गोकुळ मिस्त्री (रा. पुणे ) यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो हे कॉ भरत लिंगायत करीत आहेत.