जामनेर ( प्रतिनिधी ) – तहसीलदार कार्यालयामध्ये दिव्यांगाना अंत्योदय रेशनकार्ड आमदार गिरीश महाजन व तहसिलदारा अरुण शेवाळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
दिव्यांग बंधू-भगिनींना शासनाच्या सर्वात लाभदायी अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तालुक्यात इष्टांक शिल्लक नसतानाही शासनाच्या परिपत्रकात प्रमाणे पूर्णतः काम करून एक व दोन व्यक्ती असलेल्या कुटुंबांना प्राधान्य कुटुंब योजनेत वर्ग करून जागा रिकाम्या करण्यात आल्या दिव्यांग बांधवांचे अर्ज मागविण्यात आले तपासणी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांचे नगरपालिका आणि ग्रामपंचायत ठराव घेऊन त्या योजनेचे योजनेत जावक अटी असूनसुद्धा बसविण्यात आले यासाठी पुरवठा विभागाला मार्गदर्शन तहसीलदार अरुण शेवाळे यांनी केले अशी माहिती पुरवठा विभागातील विठ्ठल काकडे यांनी दिली.
शासन निर्णयानुसार शहरी भागातील 43 तसेच ग्रामीण भागातील 35 पात्र लाभार्थ्यांना रेशन कार्ड देण्यात आले सध्या तालुक्यात दोन लाख पाच हजार 126 व्यक्ती प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभ घेत आहेत १० हजार ३२६ कुटुंब अंत्योदय योजनेचा लाभ घेत आहेत रेशन कार्ड वितरण झाल्यानंतर तीन महिन्यांनी पुरवठा सुरू होईल असे काकडे यांनी सांगितले.
आमदार गिरीश महाजन यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले, तहसीलदार अरुण शेवाळे यांनी आमदार महाजन यांचे स्वागत केले. जामनेरचे उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील यांचे स्वागत तहसीलदार अरुण शेवाळे यांनी केले तहसीलदार अरुण शेवाळे यांचे स्वागत आमदार गिरीश महाजन यांनी केले. मनसे तालुका पदाधिकारी अशोक पाटील यांचे स्वागत विठ्ठल काकडे यांनी केले रेशन दुकानदार सुनील कुलकर्णी यांचे स्वागत पुरवठा विभागातील एस.आर.नेरकर यांनी केले विकलांग बांधवांच्या संघटनेतर्फे रवींद्र झाल्टे यांचे स्वागत गणेश राजपूत यांनी केले, राजू देशपांडे यांचे स्वागत एस.आर.नेरकर यांनी केले, जिल्हा संघटना तुकाराम निकम यांचे स्वागत आर.एच.पवार यांनी केले.