मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून जनतेसाठी चिंतेची बाब आहे. राज्यात वीकेंड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली असली आणि ठिकठिकाणी निर्बंध लादण्यात आले असले तरी कोरोना काही आटोक्यात येईना. त्यामुळे राज्य सरकार आता कडक लॉकडाउन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या सर्वपक्षीय बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असणार आहेत.
मुख्यमंत्री साहेब तुम्ही परत एकदा माणुसकीचे दर्शन घडवल ;…
दरम्यान राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनबाबत चर्चा होणार आहे. सध्याची रुग्णसंख्या ही पाच लाख आहे. पुढच्या काही दिवसात ही संख्या दहा लाखांवर गेली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे लॉकडाऊनबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षाचं मत घेतलं जाईल’, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.







