पाचोरा (प्रतिनिधी) – केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातुन सन – २०५० पर्यंतच्या लोकसंख्येचा दृष्टिकोन समोर ठेवत पाचोरा तालुक्यातील १०० आणि भडगाव तालुक्यातील ३८ गावांना सुमारे १०५ कोटी रूपयांची “हर घर नल” या पाणीपुरवठ्याच्या योजनेच्या कामांचे स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनीधी, अधिकारी व मक्तेदार यांच्या माध्यमातुन भुमिपुजन करून कामाला गती मिळेल असे आ. किशोर पाटील यांनी त्यांच्या भडगाव रोडवरील “शिवालय” या निवासस्थानी आयोजित पञकार परिषदेत माहिती दिली.
मुख्यमंञी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज पाचोरा भडगाव मतदार संघातील १३८ गावांच्या सुमारे १०५ कोटी रूपयांची पाणीपुरवठा योजना मंजुर होउन शासकिय सर्व प्रक्रिया पुर्ण झाली आहे. यासर्व गावांना जाऊन या योजनांचे उद्धघाटन करणे आमदार म्हणुन मला शक्य नाही. कारण या प्रक्रियेत सुमारे तिन महिन्यांचा कालावधी लागुन जाईल. तसेच या योजनांचे आॅनलाईन भुमिपुजन करण्याची सुविधापण नसल्याने कामाला खर्या अर्थाने गती देता येणार नाही.
आज शेतकर्यांच्या शेतात पिक नसल्याने व शेती मशागतीची कामे थांबलेली असल्याने मिळालेल्या वेळेचा सदउपयोग घेणे गरजेचे आहे. म्हणुन मी आज या सर्व योजनांचे औपचारीक उद्धघाटन झाले असे जाहिर करतो. ज्या गावांमध्ये या योजनेचे काम मंजुर आहे. त्या गावातील जेष्ठ नागरिक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनीधी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, अधिकारी व मक्तेदार यांनी वेळ मर्यादेचा विचार करून तात्काळ भुमिपुजन करून कामांना गती द्यावी असे अवाहन मी आज करित आहे. हे विकासकाम वेळेच्या आत पुर्ण झाल्यावर सन – २०५० पर्यंत प्रत्येक घराला शंभर टक्के शुध्द पाणी पुरवठा केला जाईल. याप्रसंगी तालुका प्रमुख सुनिल पाटील, पंढरीनाथ पाटील, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, प्रविण ब्राम्हणे यांचेसह मक्तेदार उपस्थित होते.