बोदवड ( प्रतिनिधी ) – बोदवड तालुक्यातील निमखेड येथील प्रा. समाधान सुरेश पाटील यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून मानसशास्त्र विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. अवघ्या २९ व्या वर्षी डॉक्टरेट पदवी संपादल्यामुळे तालुक्या त आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.डॉ. प्रा.समाधान पाटील यांना ही पदवी प्र-कुलगुरू प्रा.डॉ एस. टी.इंगळे यांच्याहस्ते देण्यात आली.प्रा. समाधान सुरेश पाटील,हे एक सामान्य शेतकरी कुटुंबतील आहेत. त्यांचे विद्यालयीन शिक्षण एणगाव येथील जी. डी. ढाके हायस्कूल येथे झाले. शालेय जीवनात अत्यंत कष्टाळू आणि चिकाटीने वावरणारा विद्यार्थी म्हणून समाधान पाटील यांची ख्याती होती. सामान्य शेतकऱ्याचा मुलगा विद्यावाचस्पती म्हणून गौरवान्वित झाल्याने एणगाव हायस्कूलमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे मानसशास्त्र या विषयात विद्यावाचस्पती पदवी प्रदान करण्यात आली. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी डॉक्टरेट पूर्ण झाली.फायनल व्हायवा साठी बहिस्थ रिफ्री म्हणून, नागपूर विद्यापठातील मानसशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रो. डॉ. सुबोध बनसोड सर, समितीचे अध्यक्ष डॉ शशिकांत खलाने, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे मानसशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रो. डॉ. सी. पी. लभाने सर, सोबत मार्गदर्शक डॉ. जयश्री सोनटक्के मॅडम. यांच्या हस्ते फुलगुच्छ देऊन समाधान यांचे अभिनंदन केले.
या यशामागे,आई मंगलाबाई, वडील सुरेश पाटील, बहिण ज्योती पाटील (सब इन्स्पेक्टर CISF CNP नाशिक), अर्धांगिनी कोमल पाटील आणि मुलगी अवनी, मार्गदर्शक जयश्री सोनटक्के मॅडम, आयुष्याचे गुरु, मार्गदर्शक प्रो. डॉ. सी. पी. लभाने सर, प्राचार्य डॉ. देशमुख सर श्रीराम पाटील , संस्थापक श्रीराम ठिबक आणि इरिगेशन, विकास पाटील, डॉ. प्रवीण बाविस्कर सर (KBP महाविद्यालय वाशी, मुंबई,) डॉ. बालाजी राऊत सर, डॉ अशोक पाटील सर, डॉ शंकर जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे प्रा. डॉ. समाधान पाटील यांनी नम्रपणे नमूद केले आहे.