पारोळा ( प्रतिनिधी ) – पारोळा शहरातील एका भागात राहणारी २९ वर्षीय तरूणीचा रस्ता आडवून मारहाण करत जबरी अत्याचार केलयाची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पारोळा शहरातील एका भागात २९ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी ८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता पिडीत तरूणी हा दुचाकीने शहरातून जात असतांना समाधान लोटन चौधरी रा. गांधी नगर, पारोळा याने तिचा रस्ता आडविला. त्यानंतर जबरी तिचा हात पकडून विनयभंग करत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत तरूणीने पारोळा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी समाधान लोटन चौधरी याच्या विरोधात पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहे.