जळगाव (प्रतिनिधी) – शिवसेना रोखठोक नेते संजय राऊत यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत विरोधात जळगांव येथे शिवसेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांना निवेदनामार्फत आज दि. ८ रोजी तक्रार अर्ज देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कंगना राणावत हिने महाराष्ट्र राज्य हे सर्वात प्रगत व सुरक्षित राज्य असतांना देखील पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केलेली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य हे तालिबान होण्याच्या मार्गावर आहे. यासह अनेक बेताल वक्तव्य केल्याने तिच्या विरुद्ध त्वरित खटला दाखल करण्यात यावा अशी तक्रार गजानन मालपुरे यांनी केली आहे.
यावेळी निवेदनामार्फत तक्रार अर्ज देतांना शिवसेना माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, राहूल नेतलेकर, ललित कोतवाल, सागर कुटुंबळे, लोकेश पाटील,विजय चौधरी, भैय्या वाघ आदी शिवसैनिक उपस्थित होते.