नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अमेरिकेतील प्रसिद्ध फार्मा कंपनी असलेल्या फायझरने त्यांची उत्पादित केलेली कोरोना प्रतिबंधक लस १६ वर्षाच्या मुलांना दिली जावी यासाठी संमती मिळण्यासाठी मागणी केली आहे. फायझर आणि बायोएनटेक या दोन कंपन्यांकडून मिळून ही लस तयार करण्यात आली आहे. या कंपन्यांनी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला (FDA) १६ वर्ष आणि त्याहीपेक्षा अधिक वयोगटातील लोकांना लस देण्यास संमती मिळण्यासाठी अर्ज करत मागणी केलीय.
अमेरिकेत या आगोदर ही लस फक्त १८ वर्ष त्याहून अधिक वयोगटातील लोकांना देण्याची समंती आहे. मात्र फायझरला (Pfizer) परवानगी मिळाल्यावर १६ वर्षांवरील लोकांना ही लस देता येणार आहे. तसेच, कॅनडाने फायझरची लस १६ वर्षांवरील लोकांना देण्यास परवानगी दिलीय. तर भारतात कोरोना प्रतिबंधक लसी अपुऱ्या पडत आहेत. यामुळे अमेरिकेच्या फायझरच्या लसीच्या अत्यावश्यक वापरासाठी संमती मिळण्याची शक्यता आहे. तर CEO अल्बर्ट बूर्ला यांनी गेल्या सोमवारी म्हटले की, फायझरच्या लसीला भारतात परवानगी मिळावी, म्हणून आमची भारत सरकारबरोबर चर्चा सुरू आहे.
या दरम्यान. फायझरने या अगोदर एप्रिल मध्ये भारतातील लसीकरण मोहिमेसाठी त्यांची लस मूळ किमतीत देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तर भारताला कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारसोबत मिळून काम करण्यास तयार असल्याचं म्हटलं होत. तसेच CEO अल्बर्ट बूर्ला म्हणाले, ‘फायझरला माहित आहे, की ही जागतिक महामारी संपवण्यासाठी लस उपलब्ध असणे आवश्यक आहे. पण ,२ महिन्यांपूर्वी अर्ज करूनही भारतात आमच्या लसीला मान्यता मिळालेली नाही. आम्ही आता भारत सरकारबरोबर याबाबत सवांद साधणार आहे. असे ते म्हणाले.
भारतात सध्या ३ लसीना परवानगी आहे १. सीरम-कोव्हिशिल्ड, २. भारत बायोटेक- कोव्हॅक्सिन, ३. रशिया – स्पुटनिक व्ही, तर अमेरिकेची कंपनी असलेल्या फायझरने भारतात अत्यावश्यक वापरासाठी परवानगी मागितली होती. त्यावेळी या लशीवर देशात अभ्यास न झाल्याने परवानगी नाकारली होती. मात्र, कंपनीने जगभरातील या लशीच्या प्रभाविततेच्या आधारे परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती.